निदर्शकांना पांगविण्यासाठी गोळीबार, पंजशीरमध्ये अद्यापही संघर्ष
काबूल / वृत्तसंस्था
एकीकडे तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असताना राजधानी काबूलमध्ये हजारो लोकांनी या राजवटीविरोधात आंदोलन चालविले आहे. मंगळवारी आंदोलन व मोर्चात सहभागी झालेल्यग्नांना पांगविण्यग्नासाठी हवेत गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. काहीजण जखमी झाले आहेत.
‘पाकिस्तानचा नाश होवो’ अशा अर्थाच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या. अफगाणिस्तात तालिबानची अत्याचारी राजवट पुन्हा येण्यास पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तान अफगाणी जनतेवर तालिबानच्या माध्यमातून सत्ता गाजवू पहात आहे. मात्र स्वाभिमानी अफगाण जनता पाकचे हे मनसुबे हाणून पाडल्यावाचून राहणार नाही, असे आंदोलक व त्यग्नांच्या नेत्यांचे प्रतिपादन आहे.
संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला ताबा आहे, असा दावा सोमवारी तालिबानकडून करण्यात आला होता. पंजशीचे युद्ध आपण जिंकले आहे, असेही तालिबानचे म्हणणे आहे. मात्र, तालिबानच्या दाव्याचा इन्कार त्याच्या विरोधकांनी केला आहे. पंजशीरमध्ये अद्यापही संघर्ष सुरु असून तालिबान राजवट तात्पुरती आहे, असेही प्रतिपादन काही स्थानिक नेत्यांनी केले आहे.
पंजशीर खोरे 1980 पासून तालिबान विरोधकांच्या हाती राहिले आहे. 80 पासून दहा वर्षे ते रशियाच्या सत्तेपासून मुक्त राहिले. या 10 वर्षांमध्ये रशियाने अफगाणिस्तानात घुसून त्या देशाचा ताबा घेतला होता. मात्र पंजशीर ताब्यात घेणे रशियाला जमले नव्हते. पुढे तालिबानच्या राजवटीतही हे खोरे आणि उत्तर अफगाणिस्तानचा काही भाग तालिबानपासून मुक्त राहिला होता. मात्र, आता पंजशीरवर पूर्ण ताबा मिळविला असून गेल्यग्ना 40 वर्षांमध्ये प्रथमच तालिबानविरोधकांचा पूर्ण पराभव झाला आहे, असा दावा तालिबानने केला.