वृत्तसंस्था / ऍडलेड
ऑस्ट्रेलियाची 19 वर्षीय महिला जलतरणपटू कायली मॅक्वॉनने ऍडलेड येथे रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ऑलिंपिक चाचणी जलतरण स्पर्धेत महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला.
ऑस्ट्रेलियाच्या मॅक्वॉनने महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 57.45 सेकंदाचा नवा विश्वविक्रम नोंदविला असून तिने यापूर्वी म्हणजे 2019 साली झालेल्या विश्व जलतरण स्पर्धेत अमेरिकेच्या रिगेन स्मिथने नोंदविलेला 57.57 सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढला. रविवारी या स्पर्धेनंतर मॅक्वॉनने आपला हा विश्वविक्रम दिवंगत वडिलांना समर्पित केला. गेल्यावर्षी मॅक्वॉन हिच्या वडिलाचे कर्करोगाने निधन झाले होते. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जलतरण प्रकारात 10 पदकांची कमाई केली होती.