वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्पूस स्टोनिस याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दंड ठोठाविला आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 लीग स्पर्धेतील शनिवारी मेलबोर्न येथे झालेल्या सामन्यावेळी स्टोनिसने ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनची वैयक्तिक थट्टा करताना काही अपशब्द वापरले.
या सामन्यावेळी स्टोनिसने रिचर्डसनची थट्टा करताना काही वैयक्तिक अपशब्द वापरल्याचे आढळून आले. शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल मेलबोर्न स्टार्स संघाकडून खेळणाऱया स्टोनिसला 7500 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठाविण्यात आला. स्टोनिसकडून गेल्यावर्षभरात असा तिसऱयांदा गुन्हा घडल्याने त्याच्यावर एक सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.