प्रतिनिधी /वास्को
नवेवाडे वास्को येथील ओमकार संगीत संस्थेतर्फे जादुगार शिरीष मडगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. दाबोळी येथील केशव स्मृती हायस्कुलचे अध्यक्ष पांडुरंग कोरगांवकर यांच्याहस्ते शिरीष मडगांवकर यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुळशिदास पटेकर, सरचिटणीस संतोष केरकर, खजिनदार राजेश नावेलकर, माजी अध्यक्ष अमृत उर्फ धर्मा साळगांवकर, विद्या सातार्डेकर व मानसी नाईक उपस्थित होते. शिरीष मडगांवकर यांनी जादुचे प्रशिक्षण मुंबई येथे घेतले. त्यांनी गोव्यात तसेच गोव्याबाहेरही जादुचे प्रयोग सादर केले. त्यांना अनेक संस्थांतर्फे गौरविण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे पांडुरंग कोरगांवकर यांनी शिरीष मडगांवकर यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष केरकर यांनी केले तर राजेश नावेलकर यांनी आभार मानले.