कंपनीची 450 हून अधिक शहरात 125000 रिटेल केंदे, टायर 3, 4 शहरात विस्तार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंख्यांची निर्मिती करणाऱया ओरिएंट इलेक्ट्रीकल लिमिटेडला येणाऱया काळात आपल्या व्यवसायाचा विस्तार भारतातल्या छोटय़ा शहरांमध्ये करायचा आहे. पंख्याचा व्यवसाय जास्तीत जास्त विस्तारण्याची योजना कंपनीने आखली आहे. येणाऱया काळात टायर थ्री, टायर फोर शहरासह ग्रामीण भागातही नवे पंखे कंपनीला सादर करायचे आहेत.
येणाऱया काळात नव्या पंख्यांची मालिका सादर केली जाणार आहे. पुढील एक वर्षाच्या काळात विक्रीला चांगली संधी असल्याचे सकारात्मक संकेत कंपनीला मिळाले आहेत. हाच आढावा घेऊन आपल्या उत्पादनांना जास्तीत जास्त शहरांपर्यंत पोहोचविण्याची किमया कंपनीला आगामी काळात पार पाडायची आहे. अति उत्तम डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या पंख्यांना येणाऱया काळात कंपनीकडून बाजारात दाखल केले जाणार आहे. विविध आकार आणि रंगसंगती मध्ये कंपनी पंखे उपलब्ध करणार आहे. कंपनीची 125000 रिटेल केंदे असून 450 हून अधिक शहरात सेवा केंदे कार्यरत आहेत. यामार्फत आपल्या पंख्यांना कंपनी तमाम ग्राहकांपर्यंत पोहोचवीत आली आहे. पंख्यांच्या बाजाराचा विचार करता ओरिएंटचा वाटा 20 टक्के इतका आहे.
वर्षाला साधारणपणे एक कोटी पंखे कंपनी निर्मिती करते. फॉर्च्यून इंडिया 500 च्या यादीत कंपनी सामावली आहे. याखेरीज या कंपनीचा विस्तार 40 देशांमध्येही बऱयापैकी विस्तारलेला आहे. लाइटिंग, स्विचेस, होम अप्लायन्सेस या क्षेत्रातही आपली उत्पादने कंपनी सादर करते आहे.