ऑनलाईन टीम / मॉस्को :
कोरोना रुग्णसंख्येत रशियाने फ्रान्स आणि इंग्लंडला मागे टाकत जगात चौथे स्थान गाठले आहे. रशियात आतापर्यंत 28 लाख 77 हजार 727 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 51 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी या देशात 29 हजार 350 कोरोना रुग्ण आढळून आले. तर 493 जणांचा मृत्यू झाला. 28.77 रुग्णसंख्येपैकी 22 लाख 95 हजार 362 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 5 लाख 31 हजार 014 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. येथे आतापर्यंत 8 कोटी 63 लाख 91 हजार 683 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 84 लाख 73 हजार 716 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 3 लाख 26 हजार 772 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा तर ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो.