प्रतिनिधी /पणजी
अभिजात सांस्कृतिक मंडळ, खोर्ली, तिसवाडी गोवा यांच्यातर्फे घेतलेल्या ऑनलाइन देशभक्तिपर गाण्याच्या स्पर्धेत ओल्ड गोवा एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.
भारताच्या हीरक महोत्सवानिमित्त खास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांसाठी आयोजित या स्पर्धेत एकूण अकरा विद्यालयांनी भाग घेतला होता. ओल्ड गोवा एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटतर्फे ’नव्या दिशेचे नव्या उषेचे गीत सूर हे गाती’ हे गीत संगीत शिक्षिका सौ. प्राची माशेलकर व श्री. वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले गेले. या देशभक्तीपर गाण्यात ऍलिस मोंतेरो, स्मिता शेट, सर्वेश्री गावस, सावी लिंगुडकर, श्रद्धा कलंगुटकर, विधी वळवईकर, नव्या माशेलकर, रिया प्रियोळकर, हर्षा गोसावी, रंजीता गोसावी व ग्ल?न्सी फर्ना?डिस यांनी भाग घेतला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्ताराम शेटकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.