ऑनलाइन टीम / औरंगाबाद
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा कोरोनाचे 54 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे औरंगाबादेत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1173 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
औरंगाबादमध्ये नव्याने आढळलेले 54 रुग्णांपैकी गरम पाणी येथील 1, शिवराज कॉलनी 1, कैलास नगर 1, सौदा कॉलनी 1, रेहमनिया कॉलनी 1, रोशन गेट 2, सिटी चौक 6, मकसूद कॉलनी 1, हडको एन -12 येथील 1, जय भीम नगर 11, हुसेन कॉलनी – गल्ली नंबर 9 मध्ये 1, खडकेश्र्वर 1, न्याय नगर – गल्ली नं.18 मध्ये 2, हर्सूल कारागृह 1, उल्का नगरी 1, टाइम्स कॉलनी 2, आदर्श कॉलनी 1, मुकुंदवाडी 5, काबरा नगर 1, उस्मानपुरा 3, हुसेन कॉलनी – गल्ली नं 10 मध्ये 4 आणि पाडेगाव येथील मीरा नगर मध्ये 4 जणांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये 28 महिला आणि 26 पुरुषांचा समावेश आहे.
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आता पर्यंत 200 पेक्षा अधिक जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.