नवी दिल्ली
मार्च महिन्यात औषध क्षेत्राच्या मागणीने चांगली प्रगती दर्शवली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता मार्च महिन्यात औषधांची मागणी 10 टक्क्यांनी वाढली आहे. विटामीनसह गॅस्ट्रोवरच्या औषधांची मागणी वाढली आहे. इंडिया रेटिंग्स आणि रिसर्च यांनी यासंबंधीची माहिती आपल्या पाहणीनंतर दिली आहे. याआधी औषध विकासाचा वर्तवलेला अंदाज 2 टक्के इतका कमीच राहिला आहे. औषध विक्री व्यवसायाचा विकास आर्थिक वर्ष 2022 मध्ये 8 ते 10 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाजही इंडिया रेटिंग्सने वर्तवला आहे.