भाग 2
बुध. दि. 17 ते 23 जून 2020
मृग नक्षत्रावर हे ग्रहण होत असून भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका, दक्षिण युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, पूर्व आफ्रिका, युरोपचा दक्षिण भाग येथे हे ग्रहण दिसेल. सकाळी 10.01 वाजता ग्रहणस्पर्श होऊन दुपारी 1.28 मिनिटांनी ते संपेल. ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर विरोधी गुरुत्वाकर्षणामुळे या काळात हवामानात अत्यंत सूक्ष्म असे कोटय़वधी विषारी जीवजंतू निर्माण होत असतात. त्यांचा अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी ग्रहण काळात खाणेपिणे निषिद्ध मानलेले आहे. गर्भवती महिलांवर ग्रहणाचा परिणाम होण्याची शक्मयता असते. त्यासाठी या काळात ‘संतान गोपाल मंत्रा’चा सतत जप करावा. इतरांनी मृत्युंजय मंत्राचा जप करावा. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास ग्रहणाबद्दलची भीती पूर्ण नष्ट होईल. दर्भ किंवा कुशासन मिळत असेल तर ते जवळ ठेवावे, म्हणजे अनिष्ट परिणाम होत नाही. ग्रहण काळात पूजा, शांती वगैरे करण्यापेक्षा स्वत: जप करणे अतिशय लाभदायक असते. मेष, सिंह, कन्या, मकर या राशींना हे ग्रहण शुभ. वृषभ, तूळ, धनु, कुंभ यांना संमिश्र, तर मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन या राशिना हे ग्रहण अनिष्ट फलदायक आहे. कोणतेही ग्रहण हे शापित दोष निर्माण करते. यावेळचे रविवारी होणारे सूर्यग्रहण अत्यंत कडक शापीत योगात आहे. त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपापल्या धर्मानुसार प्रार्थना, मंत्रोच्चारण वगैरे करावेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण व कालसर्पयोग यांचा फार जवळचा संबंध आहे. शापीत योग निर्माण होतात. आपल्या हातून कळत न कळत घडणारी बरी वाईट कृत्येच शापीत स्वरुपात दृगोच्चर होतात. या जन्मात अथवा पुढील जन्मात ती भोगावी लागतात. कुंडली चांगली असते, माणूस सरळ मार्गाने जात असतो, तरीही त्याला यश मिळत नाही. नोकऱया मिळत नाहीत, लग्नात अडथळे, प्रकृतीच्या तक्रारी, क्षणार्धात होत्याचे नव्हते होणे, बदनामी एखाद्याला मदत केलेली असेल पण तीच व्यक्ती नंतर त्याची जाण ठेवत नाही, पैसे बुडतात किंवा कोणत्या तरी मार्गाने फसवणूक तरी होते, यासह अनेक शापीत दोष पत्रिकेत दिसतात ते ग्रहणामुळेच. फक्त चंद्र-सूर्यालाच ग्रहण लागते असे नसते तर सर्व ग्रहांना राहू, केतुचे ग्रहण लागते व कालसर्पयोगाच्या वेगवेगळय़ा रुपात ते पत्रिकेत दिसते. सोमवारी करिदिन असून त्याचा अनिष्ट प्रभाव दिवसभर राहील. करिदिन हा अतिशय प्रखर असतो. त्याचे परिणाम त्रासदायक असतात. ज्या ज्या ठिकाणी ग्रहण दिसेल, त्या त्या ठिकाणी करिदिनाचा प्रभाव असतो. ब्रह्मांडातील सर्व अनिष्ट शक्तींचा वास यादिवशी पृथ्वीतलावर असतो. हा दिवस शुभ मानला जात नाही. या दिवशी काही बाधा झाल्यास त्या पटकन बाधतात. ग्रहण ही नैसर्गिक घटना असली तरी ज्योतिष शास्त्राच्या नियमानुसार त्याला अतिशय महत्त्व आहे. शापित दोष असतील तर त्याचे परिणाम त्वरित दिसून येतात. कोणतेही ग्रहण पत्रिकेत ज्या ठिकाणी पडेल तेथे, तसेच त्याच्या समोरील राशीवर त्याचा निश्चित परिणाम होतो. करिदिनाच्या दिवशी बाधिक ठिकाणी जाऊ नये, अनोळखी जागा टाळाव्यात. कुणी काही प्रसाद वगैरे खाण्याचे पदार्थ या काळात दिल्यास ते स्वीकारू नये, कुणी दान वगैरे देत असेल तर ते चुकूनही घेऊ नये. दान देणाऱयाची सर्व पीडा, साडेसाती, शापीत दोष, पिशाच्च दोष व संकटे आपल्याकडे येतात व नंतर ते निस्तरणे कठीण होते. मोठे व्यवहार जपून करावेत. वाहन अपघाताची शक्मयता असल्याने वेगावर नियंत्रण ठेवावे.
मेष
सूर्यग्रहण तुम्हाला शुभ आहे. धनलाभ, प्रवास, कर्जफेड, नोकरी व्यवसायात यश या दृष्टीने चांगले योग. पण वास्तुदोष, नातेवाईकांशी वितंडवाद व लिखाणामुळे नको ते प्रसंग येऊ शकतील. कुणाच्याही सांगण्यावरून रहात्या वास्तुत अथवा वाहनात काही फेरबदल करू नका, धोका होऊ शकेल.
वृषभ
सूर्यग्रहण तुम्हाला आर्थिक बाबतीत त्रासदायक आहे. अचानक खर्च वाढतील. नको त्या कामाची जबाबदारी पडेल. आर्थिक बाबीवरून नातेवाईकांच्या वागण्यात फरक जाणवेल. त्याचबरोबर हातून निसटलेली एखादी महत्त्वाची संधी पुन्हा मिळेल. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका.
मिथुन
सूर्यग्रहण तुमच्या राशीतच होत आहे. तुम्हाला जरा अशुभ आहे. आरोग्य, मानसिक स्थिती व प्रति÷sवर परिणाम करणारे असल्याने काळजी घ्या. सर्व बाबतीत सावध रहाणे तुम्हाला हितावह ठरेल. आर्थिक व्यवहारात घोटाळे होण्याची शक्मयता. पडझड, आर्थिक हानी, बदनामी प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारे असल्याने तसेच सर्व बाबतीत सावध राहिलात तर काहीही त्रास होणार नाही.
कर्क
सूर्यग्रहण अनिष्टस्थानी होत आहे. सर्व बाबतीत सांभाळावे. गुप्तशत्रुंच्या कारवाया वाढतील. करणीबाधा, अन्नातून, प्रसादातून विषबाधा कोर्टप्रकरणे यांची शक्मयता. निष्कारण कामाचा व्याप वाढवू नका. सावधगिरी बाळगलात तर दैवी शक्तीची कृपाही मिळेल. कोणत्याही शासकीय प्रकरणात अडकू नका. कागदपत्रावर एकदम सही करू नका.
सिंह
सूर्यग्रहण लाभस्थानात होत असून शुभ फळ देणारे आहे. आर्थिक सुधारणा मित्र मंडळींचे सहकार्य तसेच प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या कामात उत्तम यश मिळेल. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. तसेच गुप्तशत्रुंच्या कारवायावर लक्ष ठेवा. तसेच रुपावर भुलून नको त्याच्या प्रेमात पडू नका.
कन्या
दशमातील ग्रहण तुम्हाला शुभ आहे. नोकरी व्यवसायात नजर लागण्यासारखे यश मिळेल. पगारवाढ तसेच अनपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकेल. आरोग्यात सुधारणा तसेच पूर्वी झालेले गैरसमज दूर होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. ग्रहणाचा कोणताही अनिष्ट प्रभाव जाणवू नये. यासाठी दत्त उपासना अथवा नवग्रह स्तोत्राचे वाचन करावे. घरातील अडगळ काढावा.
तुळ
सूर्यग्रहण भाग्यस्थानात होत आहे. मध्यम फलदायक आहे. प्रवासाच्या बाबतीत जपावे. सासरच्या व्यक्तींना अनिष्ट फलदायी. प्रवास, भाग्योदय, हरवलेल्या व्यक्ती अथवा वस्तू सापडणे सहज म्हणून केलेल्या अर्जामुळे उत्तम नोकरी मिळणे, असे शुभ अनुभव येतील. कोठे पैसे अडकले असतील तर ते या महिनाभरात मिळू शकतील.
वृश्चिक
राशीच्या आठव्या स्थानात कंकणाकृती सूर्यग्रहण मृत्युषडाष्टकात होत आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी व्यवसायात जपून रहा. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोठेही गेल्यास बाधिक वस्तुंना स्पर्श करू नका. धोका होऊ शकतो. नको ते विकार उद्भवतील. कुणीतरी तुम्हाला नको त्या ठिकाणी घेऊन जाण्याची शक्मयता आहे.
धनु
कंकणाकृती सूर्यग्रहण सप्तमात होत आहे. भागीदारी व्यवसाय व वैवाहिक जीवनावर त्याचा प्रभाव पडेल. मध्यम स्वरुपाचे फळ देणारे आहे. वैवाहिक जीवनात नको त्या व्यक्तीमुळे गैरसमज होतील. त्यामुळे काही बेत अथवा जागा बदलण्याचा प्रसंग येईल या पंधरवडय़ात प्रवास वगैरे महत्त्वाची कामे जपून करावीत.
मकर
सूर्यग्रहण षष्टस्थानी पडत आहे. अत्यंत शुभ आहे. कितीही प्रखर शत्रू असले तरी ते थंड पडतील. धनलाभाचे अनेक योग येतील. वाईटातून चांगले करणारे हे ग्रहण आहे. त्याचा अनुभव महिनाभरात येईल. वारंवार प्रवास होत असेल, वा व्यवसाय असेल तर सांभाळावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ
पंचमस्थानात होणारे सूर्यग्रहण तुम्हाला संमिश्र फलदायक आहे. संततीच्या दृष्टीने त्रासदायक, घराण्यातील शापीत दोषाचा प्रखर परिणाम जाणवेल. मुलाबाळांच्या बाबतीत चिंतेचे प्रसंग, प्रेमप्रकरणे असतील तर मोठी निराशा पदरी पडेल. पण शत्रूनाशाच्या दृष्टीने चांगले ठरेल.
मीन
सुखस्थानी होत असलेले सूर्यग्रहण अतिशय अशुभ आहे. कौटुंबिक बाबतीत त्रासदायक वातावरण. पडझड, दुरुस्ती करताना नुकसान, आर्थिक हानी असे प्रकार घडू शकतील. कौटुंबिक सदस्यांच्या बाबतीत काळजीचे प्रसंग. वास्तू स्वच्छ व पवित्र ठेवा. काहीही त्रास होणार नाहीत.