शासकीय मदत, माजी विद्यार्थी, बांधकाम कमिटीचे देणगीदारांचे मोलाचे सहकार्य
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
मराठी प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून पहिल्या मजल्याची स्लॅबभरणी नुकतीच झाली.
नूतन शाळा बांधण्याचे काम आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांतून शासकीय मदत, माजी विद्यार्थी संघटना, बांधकाम कमिटी, देणगीदार व ग्रामस्थ आदी सर्वांच्या आर्थिक मदतीतून होत असल्याचे सांगण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा संध्या चौगुले होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. उपाध्यक्षा अनिल पावशे, बांधकाम कमिटी अध्यक्ष दत्ता पाटील, शाळा सुधारणा अध्यक्ष मोहन भैरटकर, हभप भाऊराव पाटील, फर्निचर कंत्राटदार तानाजी पाटील, बापू पाटील, हेस्कॉम कर्मचारी मनोहर कडोलकर, उद्योजक विजय पावशे, भाऊराव मो. पाटील, किरण तरळे, मनपा कंत्राटदार हणमंत पाटील, अशोक पाटील, जी. वाय. अष्टेकर, जि. पं. अभियंता टी. एफ. बन्नूर, अभियंता प्रकाश कोळी, विलास खन्नूकर, अभियंता कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते. शंकर कोनेरी यांनी स्वागत करून प्रास्ताविकमध्ये प्राथमिक मराठी शाळेचे बांधकाम शासकीय निधीतून तसेच देणगीदारांच्या देणगीतून होत असून माजी विद्यार्थी व इतर देणगीदारांनी सढळ हस्ते मदत करून शाळा पूर्णत्वास नेण्याचे आवाहन केले. यावेळी विजय पावशे, अशोक पाटील, हणमंत पाटील, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ग्रा. पं. सदस्या भारता पाटील, पूनम पाटील, सुचिता कोळी, रेखा सुतार यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. काँक्रीट मशीनचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. देणगीदारांच्या हस्ते काँक्रीट ओतून स्लॅबभरणीला प्रारंभ केला. तत्पूर्वी देणगीदारांचे व मान्यवरांचे बांधकाम कमिटी व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ऍड. सुधीर चव्हाण, अनिल पावशे, संध्या चौगुले, मनोहर कडोलकर, राजकुमार पाटील यांनी शाळेला शासकीय निधी मिळत असतानाही इतर देणगीदारांच्या आर्थिक सहकार्यानेच शाळेचे काम पूर्णत्वास येणार असल्यामुळे देणगीदारांनी जास्तीत जास्त देणगीरुपाने आर्थिक मदत करून शाळेचे बांधकाम पूर्णत्वास आणण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, तानाजी पाटील, यल्लोजी पाटील, बाबू दोडमनी, मल्लाप्पा पाटील, निरंजन जाधव, राजू मन्नोळकर, मारुती आपटेकर, नितीन पवार, सुशांत पवार, बांधकाम कमिटीचे सदस्य, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शाळा इमारत बांधकामाला खालीलप्रमाणे देणग्या मिळाल्या
तानाजी भ. पाटील, ओमकार ज. पाटील, हभप भाऊराव ल. पाटील, भाऊराव मो. पाटील प्रत्येकी 11,000 रुपये, प्रकाश कलगोंडी कोळी 7,000 रुपये, कल्लाप्पा शं. पाटील, तानाजी वि. पाटील, डी. जी. खन्नूकर प्रत्येकी 5,000 रुपये, अमित पिसाळे (बेनकनहळ्ळी) 1,000 रुपये. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शंकर कोनेरी यांनी केले. ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील यांनी आभार मानले.