कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील कचऱयाची उचल करण्याऐवजी ठिकठिकाणी साचलेल्या कचऱयाला कुंडीतच आग लावण्यात येत आहे. ही बाब कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे कचऱयाला आग लावणाऱया कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरातील काही भाग स्वच्छ केला जातो. पण काही ठिकाणी साचलेल्या कचऱयाची उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 8 ते 15 दिवस कचऱयाची उचल करण्यात आली नसल्याने कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. तरीदेखील कॅन्टोन्मेंट बोर्डचे कर्मचारी कचऱयाची उचल करण्याकडे कानाडोळा करीत असल्याची तक्रार होत आहे. काही ठिकाणी साचलेल्या कचऱयाला कॅन्टोन्मेंट बोर्डचे कर्मचारीच आग लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. कचऱयाला आग लावण्यात येऊ नये अशी सूचना स्वच्छता कामगारांना देण्यात आली होती. पण झाडाचा पाला असल्याचे सांगून आग लावण्यात येत होती. मात्र, कोणत्याही प्रकारचा कचरा असला तरी त्याची उचल करा असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम व कर्मचाऱयांना बजावला होता. पण काही कर्मचाऱयांनी याकडे दुर्लक्ष करून साचलेल्या कचऱयाची उचल करण्याऐवजी आग लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी कर्मचाऱयांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कचऱयाला आग लावून प्रदूषण निर्माण करणाऱया कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पाच कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सदर कर्मचाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कचऱयाची उचल करण्याऐवजी आग लावून कामचुकारपणा चालविला होता. बहुतांश ठिकाणी कचराकुंडीतच आग लावण्यात येत होती. त्यामुळे परिसरात प्रदूषण निर्माण होत होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी ही बाब गांभिर्याने घेऊन कर्मचाऱयांना नोटीस बजावली आहे.