वार्ताहर / कडोली
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी च्या गजरात कडोली आणि जाफरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कडोली येथे भव्य अश्वारुढ शिवपुतळ्यासमोर झालेल्या कार्यक्रमात प्रथम महिला मंडळाने शिवबाचा पाळणागीत म्हटले. रिती रिवाजाप्रमाणे विधी पार पडल्यानंतर जि. पं. उपाध्यक्ष अरुण अण्णू कटांबळे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य, सदस्या युवक मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
तर जाफरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रथमतः शिवभक्त कार्यकर्त्यांनी संपूर्ण गावभर मिरवणूक काढून जागृती निर्माण केली. श्री बसवाण्णा मंदिराजवळ साजरा झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात कृष्णा अर्जुन कटांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तर हेमंत लक्ष्मण मुतगेकर यांच्याहस्ते शिवपुतळय़ाचे पूजन करण्यात आले. यावेळी भरमा पाटील, लक्ष्मण पाटील, बाळकृष्ण पाटील, बंडू रामू बेळगावकर, निंगाप्पा अर्जुन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.