प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात झाडे आहेत. त्या ठिकाणी पाणीही आहे. हा परिसर निसर्गरम्य असून या परिसरात पक्षीधाम करावे, अशी मागणी नागरिकांनी कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील मुख्य प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणबर्गी परिसर हा निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. सिद्धेश्वर मंदिर पसिरात मोठय़ा प्रमाणात झाडे आहेत. या ठिकाणी पक्षांचा वावरही आहे. त्यामुळे आणखीन वृक्षारोपण तसेच इतर सुविधा उपलब्ध केल्यास पक्षीधाम म्हणून निश्चितच हा परिसर ओळखला जावू शकतो. तेंव्हा सरकारकडे पाठपुरावा करून या परिसराचा विकास करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
आमदार अनिल बेनके उपस्थित होते. निवेदन देताना ऍड. एन. आर. लातूर, डॉ. अमित भाते, किरण नागलोटी, डॉ. बसवराज आडी, विजयकुमार पाटील, संतोष झवरे, बसवराज कोटीवाले यांच्यासह इतर मॉर्निंग वॉकर्स मोठय़ा संख्येने उपस्थित होते.