53 व्या ‘अ’ गट मराठी नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रतिनिधी / पणजी
कला अकादमीने आयोजित केलेल्या 53 व्या ‘अ’ गट मराठी नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विमलानंद कलामंच, लाडेवाडा, करंझाळे-मडकई यांनी सादर केलेल्या भवाल या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. अपरांतमाची, पणजी यांच्या लग्न फेरे या नाटय़प्रयोगास पंचाहस्तर हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच रसरंग, उगवे यांच्या अन्ध युग या नाटकाची पन्नास हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक केतन जाधव यांना ‘भवाल’ या नाटकासाठी प्राप्त झाले असून ज्ञानेश मोघे यांना ‘लग्न फेरे’ नाटकासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले तर तृतीय पारितोषिक ‘अन्धा युग’ नाटकासाठी निलेश महाले यांना देण्यात आले.
पुरूष गटात वैयक्तिक अभिनयासाठी सलील नाईक यांना ‘लग्न फेरे’ नाटकातील निहारच्या भुमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून द्वितीय पारितोषिक श्रवण फोंडेकर यांना ‘भवाल’ नाटकातील फकीर -3 या भुमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे संतोष नाईक (सत्येन बॅनर्जी-भवाल) मंदार जोग (भवालकुमार-भवाल) वर्धन कामत (गेबडिनर विथ फेंडस्) सतीश गावस (वकील एक लग्न फेरे) मयूर मयेकर (अश्वत्थामा-अन्धा युग) यांना प्राप्त झाली.
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी दीपलक्ष्मी मोघे यांना ‘लग्न फेरे’ नाटकातील रजनी भुमिकेसाठी प्रथम परितोषिक जाहीर करण्यात आले असून शेफाली नाईक यांनी ‘स्वार्थ पारायण’ नाटकातील मारिया भुमिकेसाठी द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्त्राr गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे संस्कृती रायकर (कॅरन-डिनर विथ फेंडस्) श्वेता महाजन (रमाबाई-स्वामी) चतुरा रायकर (ज्योतिर्मयी-भवाल) सोनिया शेटय़े (येसूबाई-इथे ओशाळला मृत्यू) प्राजक्ता कवळेकर (राणी विभवती-भवाल) यांना प्राप्त झाली.
उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक सौमित्र बखले यांना ‘अन्धा युग’ नाटकासाठी प्राप्त झाले असून संदीप कळंगुटकर यांना ‘लग्न फेरे’ नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. ‘अन्धा युग’ या नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी निलेश महाले यांनी पारितोषिक मिळविले तर प्रशस्तीपत्र ‘लग्न फेरे’ नाटकासाठी वासुदेव चोपडेकर यांना देण्यात आले. वेषभूषेसाठीचे बक्षिस अपुर्वा तिवरेकर यांना ‘भवाल’ नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्र शनया महाले यांना ‘अन्धा युग’ नाटकासाठी देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषिक रोहन रविंद्र नाईक यांनी ‘भवाल’ या नाटकासाठी प्राप्त केले असून ऐश्ली मेंडोन्सा यांना ‘स्वार्थ पारायण’ या नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले. रंगभूषेचे पारितोशिक प्रदीप गोवेकर यानी ‘भवाल’ या नाटकासाठी संपादन केले. तर अमिता नाईक यांना ‘अन्धा युग’ या नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. स्वतंत्र नाटय़संहिता लेखनाचे प्रथम पारितोषिक कौस्तुभ सोमनाथ नाईक यांना ‘भवाल’ नाटकासाठी देण्यात आले असून खास स्पर्धेसाठी नाटय़संहिता अनुवादनाचे पारितोषिक ज्ञानेश मोघे यांना ‘लग्न फेरे’ या नाटकासाठी देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध संस्थांकडून एकुण 11 नाटके सादर झाली. या स्पर्धेचे परीक्षण प्रदिप वेर्णेकर, राजीव शिंदे व विष्णूपद बर्वे या परीक्षक मंडळाने केले. पारितोषिकप्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल याची नाटय़पेमी रसिकांनी व स्पर्धकांनी नोंद घ्यावी असे कला अकादमीतर्फे कळविण्यात आले आहे.