प्रतिनिधी/ कराड
कराड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी, येथील माजी नगराध्यक्षा ऍड. विद्या साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी ऍड. विक्रम व्ही. कुलकर्णी, सचिवपदी ऍड. महेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱयांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य ऍड. मानसिंगराव पाटील, ऍड. सतीश पाटील, ऍड. पी. एच. चव्हाण, ऍड. सी. बी. कदम, ऍड. एम. टी. देसाई, ऍड. शरद पाटील, ऍड. नितीन पाटील, ऍड. प्रताप पाटील, ऍड. गजाला सय्यद, ऍड. आशा जांभळे, ऍड. शाहीन बारगिर, ऍड. दीपाली ढोंबळे उपस्थित होते.