किसान पेडिट कार्डवर पशुपालकांना मिळणार सवलतीच्या दरात कर्ज
प्रतिनिधी /बेळगाव
पशुपालकांना आर्थिक पाठबळ देण्याबरोबरच स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने पशुकिसान पेडिट योजना राबविली आहे. याअंतर्गत भूमीहीन पशुपालकांना सवलतीच्या दरात कर्जाचे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांची धडपड सुरू असून आतापर्यंत 210 हून अधिक अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल झाले आहेत. याबरोबरच इतर पशुपालकांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. दूध उत्पादनात घट होऊन अर्थकारण कोलमडले आहे. अशा कठीण परिस्थितीत पशुपालकांना जनावरांच्या देखभालीसाठी कर्जपुरवठा केला जाणार आहे. अनेक पशुपालकांकडे गोठा, विद्युत आणि पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे जनावरांची देखभाल करताना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता हा कर्जपुरवठा केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार गाय आणि म्हैस या जनावरांना शेतीच्या पिकाप्रमाणे कर्ज दिले जाणार आहे. 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा असणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतीला फटका बसला आहे. पिके कुजल्याने चाऱयाचा प्रश्नदेखील निर्माण होणार आहे. ओल्या चाऱयाबरोबरच सुक्मया चाऱयाचा प्रश्नदेखील गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत किसान पेडिट कार्ड योजनेद्वारे पशुपालकांना सवलतीच्या दरात दिले जाणारे कर्ज आधार ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांची धडपड सुरू झाली असून पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज दाखल होत आहेत.