बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कर्नाटकात परतणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतु, क्वारंटाइन वॉच आणि अपथमित्र’ असे तीन अॅप्स डाउनलोड करावे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे हे आगमन केंद्र सरकारच्या 2 ऑगस्टच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित आहे.
अल्प-मुदतीच्या प्रवाशांनी अहवालाच्या सत्यतेच्या संदर्भात घोषणा फॉर्म सादर करणे आवश्यक आहे आणि अन्यथा फॉर्म सादर न केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. प्रवासापूर्वी ९६ तासांच्या आत चाचण्या घेण्यात आल्या असाव्यात. असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हंटले आहे.