ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानमध्ये एका स्थानिक क्रिकेट सामन्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात ही घटना घडली.
खैबर पख्तूनख्वा येथे स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता. या सामन्याला राजकीय मंडळींसह माध्यमांच्या प्रतिनिधींचीही गर्दी होती. दरम्यान, मैदानाच्या शेजारील डोंगरावरून दहशतवाद्यांनी अंधाधूंद गोळीबार सुरू केला. त्यावेळी सैरभैर झालेल्या खेळाडूंसह प्रेक्षकांनीही पळ काढला. दहशतवाद्यांनी मैदानातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील काही सरकारी कार्यालयांमध्येही तोडफोड केली.
जमियत उलेमा-ए-इस्लाम पक्षाचे स्थानिक नेते हाजी कासिम गुल देखील प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. या घटनेनंतर आयोजकांनी हा सामना रद्द केला.