बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे कायदा व संसदीय कार्यमंत्री जे.सी. मधुस्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना चाचणीनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर आणि कुक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मंत्री मधुस्वामी यांनी कोरोना चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी सायंकाळी मधुस्वामी यांना बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी कर्नाटक विधानसभा अधिवेशनात हजेरी लावली होती.
नुकतेच कर्नाटकमधील ज्येष्ठ आमदार एच. के. पाटील, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ आणि गांधीनगरचे आमदार दिनेश गुंडू राव यांनी शनिवारी झालेल्या कर्नाटक विधानसभा अधिवेशनात सहभाग घेतला होता. या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.