बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये दुसर्या डोससाठी ७० टक्के कोविशील्ड लस वापरली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी दिली आहे. राज्यामध्ये कोविशील्ड लसीच्या उपलब्ध ७० टक्के साठ्याचा वापर ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठी केला जाईल, ज्यांना दुसरा डोस द्यावा लागणार आहे त्यांना ही लस दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. उर्वरित ३० टक्के लसीचा वापर ४५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पहिला डोस देण्यासाठी केला जाणार आहे.
“कोव्हॅक्सिन लस फक्त ४५ वर्षावरील व्यक्तींना दिली जाईल. पहिल्या डोसच्या ६ आठवड्यांनंतर दुसरा डोस देण्यासाठी या लसीचा वापर केला जाणार आहे “, असे मंत्री सुधाकर यांनी ट्विट केले.