बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये मंगळवारी सलग दुसर्या दिवशी आठ हजाराहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ७,६६५ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
यापैकी बेंगळूरमध्ये २,२४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी राज्यातील ८,३८७ रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोनाची ७९,७८२ सक्रिय प्रकरणे आहेत. चोवीस तासात राज्यात एकूण १३९ कोरोना संक्रमित रूग्णांचा बळी गेला, त्यापैकी ४९ रुग्ण बेंगळूर मधील आहेत.