बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनामुळे आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान हवेरी, चिकबळ्ळापूर, चिकमंगळूर, रायचूर, रामनगर आणि यादगीर या सहा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत नाही. गुरुवारपर्यंत आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील विविध रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये २०५ रुग्ण दाखल आहेत.
यापैकी ८९ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. तुमकूर येथे १३, गुलबर्गा १२ आणि हासन जिल्ह्यात ९ रुग्ण दाखल आहेत. दक्षिण कन्नड, दावणगिरी आणि धारवाड जिल्ह्यात प्रत्येकी ६ रुग्ण आहेत. चिकमगलुरू, चित्रदुर्ग आणि उडुपी जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आयसीयूमध्ये ९५६ रुग्ण उपचार घेत होते. जी आतापर्यंतची सर्वोच्च आहे. जवळपास सर्व रुग्णालयांचे आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड भरले होते. रूग्णांना एका हॉस्पिटलमधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये जाणे भाग पडले.
हावेरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र दोडमणी यांनी शेवटच्या रुग्णाला आयसीयूमधून ३१ डिसेंबर रोजी सोडण्यात आले. जिल्ह्यात २० सक्रिय प्रकरणे आहेत. यापैकी फक्त एक रूग्णालयात दाखल आहे.