ऑनलाईन टीम / लखनऊ :
महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या छेडछाडप्रकरणी वाराणसीतील भाजपचे माजी आमदार माया शंकर पाठक यांना त्यांच्याच भगतुआ येथील महाविद्यालयात काही लोकांनी मारहाण केली होती. रविवारी या मारहाणीचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.
या मारहाणीचा व्हिडिओ उत्तर प्रदेशचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी ट्विट करून पोलिसांना या माजी आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास चौबेपूर स्टेशनच्या पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार, माया पाठक यांच्यावर आपल्याच महाविद्यायातील विद्यार्थिनीवर छेडछाड केल्याचा आरोप मारहाण करणारे लोक करत आहेत. पाठक यांनीही आपली चूक कबूल केली आहे.