बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. राज्यात कोरोनाच्या संसर्गाने शनिवारी नवा विक्रम नोंदविला. राज्यात दर तासाला सुमारे ७२८ नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. राज्यात २४ तासात १७ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी राज्यात १७,४८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाने जरी केलेल्या बुलेटीननुसार शनिवारी राज्यात ५,५६५ रूग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात कोरोना रुग्णांचीएकूण एकूण सक्रिय प्रकरणे वाढून १,१९,१६० झाली. राज्यात गेल्या चोवीस तासात राज्यात ८० संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने होत आहे. शनिवारी जिल्ह्यात ११,४०४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३२५७ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. तर कोरोनामुळे शनिवारी ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.