बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना संख्येबाबत कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली असल्याचे मंगळवारी मान्य केले. “राज्यात दुसरी लाट सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकांनी जागरुक राहावे आणि कोविड -१९ नियमाचे पालन केले पाहिजे याची दक्षता घ्यावी,” असे ते म्हणाले.
राज्यभर मास्क न घालणारे आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे सुधाकर म्हणाले. “पुढील दोन महिने कामकाज व मेळावे टाळले जावेत,” असे आवाहन त्यांनी केले.