बेंगळूरप्रतिनिधी
कर्नाटकमधील कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे सिद्ध होत आहे. मंगळवारी दररोज नोंदविण्यात आलेल्या नवीन प्रकरणांची संख्या ६ हजाराच्या वर गेली. राज्यात गेल्या चोवीस तासात ३९ कोरोना संक्रमित मृत्यूमुखी पडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या बुलेटिननुसार मंगळवारी ३,४८७ रुग्ण बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी परत आले आहेत. तर राज्यात मंगळवारी ६,१५० नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. यश राज्यात उपचारात सणाऱ्या रुग्णांची संख्या ४५,१०७ वर पोहोचली आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक नवीन प्रकरणे आढळली आहेत. मंगळवारी जिल्ह्यात ४,२६६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २४१७ रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परत आले आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात सध्या ३२,६०५ रुग्ण उपचारात आहेत. तर कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.