बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी १३ हजाराहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी राज्यात कोरोनाचे ५,७७८ नवीन रुग्ण आढळले. बेंगळूरमध्ये नेहमीप्रमाणे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात २,८०७ नवीन संक्रमित रुग्णांची भर पडली. गुरुवारी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होण्याऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. १३,५५० रुग्णांनी कोरोनावर मत केली. तर एकूण ७४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी ३६ जण बेंगळूर मधील आहेत. आतापर्यंत १०,७७० रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
गुरुवारी, राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९२,९२७ होती. यापैकी बेंगळूरमध्ये ५८,४३१ सक्रिय रुग्ण आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरूवारी कोरोनावर विजय मिळवत सर्वाधिक रुग्ण घरी परतले. यावेळी ७,६८३ रुग्णांना गुरुवारी डिस्चार्ज दिला. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.