गुजरात प्रकल्पातून साधला उच्चांक, वाहनविक्री पुन्हा तेजीत येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनी सुझुकी मोटारच्या जवळपास 10 लाख उत्पादनाचा यशस्वी टप्पा गुजरात प्रायव्हेट लिमिटेडने(एसएमजी)नुकताच पार केला आहे. एसएमजी भारतामध्ये जपानमधील कंपनी सुझुकी मोटार कार्पोरेशनसाठी वाहन निर्मिती करते. या प्रकल्पातून उच्चांकी उत्पादन करण्यात कंपनीला यश आलंय.
चालू वर्षात 21 ऑक्टोबरच्या दिवशी उत्पादनाचा उच्चांक प्राप्त केला आहे. सुझुकीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सुझुकीच्या कोणत्याही उत्पादन प्रकल्पातून 10 लाख उत्पादनाचा टप्पा वेगाने प्राप्त करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचेही सांगितले आहे.
एसएमजीने पेबुवारी 2017 मध्ये उत्पादनास सुरूवात केली होती. या प्रकारे जवळपास तीन वर्ष 9 महिन्यात हा टप्पा गाठला आहे. एसएमजी मारुती सुझुकी इंडियाला वाहनांचा पुरवठा करत आली आहे.
गुजरातच्या हंसलपुरमधील हा प्रकल्प असून बलेनोसोबत उत्पादनाचा प्रारंभ केला होता. यासोबतच सुझुकीने जानेवारी 2018 मध्ये स्विफ्टचे उत्पादनही सुरु केले होते. प्रकल्पातून मार्च 2018 पासून निर्यातीस प्रारंभ झाला आहे. सुझुकीकडून आर्थिक वर्ष 2018-19मध्ये भारतात 15.8 लाख वाहनांचे उत्पादन करण्यात आले होते.