बेंगळूर/प्रतिनिधी
शनिवारी कर्नाटकात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. गेल्या चोवीस तासात राज्यात शनिवारी ८,३६४ कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्याच वेळी घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या १०, ८१५ होती. शनिवारी पुन्हा बंगळूरमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले असून शहरात ३,७३३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९८,५६४ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी राज्यात ६३,७८४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. शनिवारी राज्यात, गेल्या चोवीस तासांत एकूण ११४ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.