बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. शनिवारी राज्यात ३,०१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या दररोज कमी होत आहे. शनिवारी राज्यात विविध जिल्ह्यातून ७,४६८रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर एकूण २८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ११,१६८ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे ५५,०१७ रुग्ण उपचार घेत आहेत.
शनिवारी बेंगळूरमध्ये १,६२१ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. बेंगळूरमध्ये सध्या कोरोनाचे ३४,४५९ सक्रिय रुग्ण आहेत. बेंगळूरमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बेंगळूर शहरी जिल्ह्यात ४,६७९ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी परतले आहेत. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.