बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीच्या उद्रेकानंतर जवळपास एक वर्षानंतर कर्नाटक विधानसभेची कार्यवाही येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार आहे. असे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी मंगळवारी सांगितले. कोविड -१९ प्रोटोकॉलअंतर्गत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सुमारे महिन्याभराच्या सत्राची विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सामान्य लोकांना अभ्यागत गॅलरीमधून कार्यवाही पाहण्याची परवानगी असेल. परंतु यावेळी विद्यार्थ्यांना परवानगी दिली जाणार नाही,” असे ते म्हणाले.
गेल्या वर्षी झालेल्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात जनतेला परवानगी नव्हती. येत्या अधिवेशनात ‘वन नेशन्स, वन इलेक्शन’ या विषयावरील चर्चेसहित कार्यक्रमांची मालिका तयार करण्यात आल्या आहेत, असे कागेरी म्हणाले. कर्नाटक मनी सावकार कायद्यात बदल करण्यासाठी किमान तीन दुरुस्ती बिले सादर केली जातील, असे सभापती म्हणाले.