सातारा : सातारा परिवहन विभागाच्या (आरटीओ) परिसरात आज दुपारी रिक्षाची धडक एका कर्मचाऱ्याला बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचे नाव समजू शकले नाही. अपघातानंतर जखमीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी दुपारी वाहनांची टेस्ट सुरू होती. त्यावेळी एका रिक्षाचा अपघात होऊन ती आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्याला धडकली. रिक्षाचा दणका जोरात बसल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमीची माहिती घेतली आहे.