बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सध्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बुधवारी राज्यात ८,०४५ कोरोना रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्नालयातून घरी परतले. यासह, रे राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७,८८,७८० वर पोहोचली आहे. दरम्यान राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या ३५,६९३ आहे. बुधवारी ३,३७७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर आरोग्य विभागाने जरी केल्या माहितीनुसार ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने आतापर्यंत ११,२८१ रूग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ८,३५,७७३ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आयसीयूमध्ये ९२८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात राज्यात मृत्यूचे प्रमाण एक टक्के होते तर सकारात्मकतेचा दर ३.२९ टक्के होता.
गेल्या २४ तासांत २७,४५८ जलद प्रतिजैविक आणि ७५,०४५ आरटी-पीसीआर चाचणीसह एकूण १,०२,५०३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. बुधवारपर्यंत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३७ टक्के तर मृत्यूचे प्रमाण १.३४ टक्के होते.