बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेसचे आमदार बी. नारायण राव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर बेंगळूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार नारायण राव प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती बुधवारी डॉक्टरांनी दिली आहे.
बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार नारायण राव यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना १ सप्टेंबरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सध्या नारायण राव व्हेंटिलेटरवर असून त्यांना ब्लड प्रेशर आणि डायलिसिस यासारख्या व्याधी आहेत. तब्बेत खालावल्याने ते अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत. मनिपाल रुग्णालयांचे संचालक डॉ. मनीष राय यांनी सांगितले की नारायण राव यांच्यावर एक तज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करता असून त्याच्या परिस्थितीवर बारकाईने लसख असल्याचे म्हंटले आहे.