बेंगळूर/प्रतिनिधी
मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे शुल्क वाढविण्याच्या वाढत्या तक्रारींवर कारवाई करत राज्य सरकारने कर्नाटकसाठी परिवहन व हाताळणी शुल्क निश्चित केले आहे. प्रमाणानुसार सर्वाधिक शुल्क ३५-६० रुपये दरम्यान निश्चित केले गेले आहे.
खाजगी रुग्णालये आणि निर्संग होम्स असोसिएशनने (पीएचएएनए) वाढीव दराने ऑक्सिजन घेण्याची किंवा पुरवठा बंद करण्याची धमकी दिल्याबद्दल संबंधित कंपन्यांविरूद्ध तक्रार केली होती. दरम्यान राज्य सरकारला वाहतुकीचे दर निश्चित करण्याचे आवाहन केले.
१० टनांपर्यंत ऑक्सिजनसाठी सरकारने आता प्रति किमी जास्तीत जास्त ३५ रुपये निश्चित केले आहेत. आपल्याला १०-२० टनांसाठी प्रति किमी जास्तीत जास्त ४० रुपये द्यावे लागेल, १५-२० टनांसाठी जास्तीत जास्त ४५ किमी प्रति किमी, २०-३० टनासाठी जास्तीत जास्त ५२.५ आणि ३० टनपेक्षा असल्यास जास्त ६० रुपये द्यावे लागतील.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने (एनपीपीए) २५ प्टेंबरला सर्वाधिक दर निश्चित केला होता पण पुढच्या सहा महिन्यांपर्यंत कंपन्यांना राज्य स्तरावर वाहतुकीचा खर्च वाढविण्याची मुभा देण्यात आली. तथापि, परिवहन खर्च निश्चित करण्यासाठी राज्य सरकार जबाबदार होते. एनपीपीएने प्रति क्यूबिक मीटर द्रव ऑक्सिजनची किंमत १५.२२ रुपये आणि ऑक्सिजन सिलिंडरची किंमत २५.७१ रुपये प्रति क्यूबिक मीटर निश्चित केली आहे. कंपन्यांच्या माहितीनुसार वाहतुकीच्या खर्चामुळे एनपीपीएच्या निश्चित दराने ऑक्सिजन तयार करणे आणि पुरवणे त्यांच्यासाठी शक्य नाही. पीएचएएनएने राज्य औषध नियंत्रक प्राधिकरणाला पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली होती.