बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) २०२० चा निकाल २० ऑगस्टला (गुरुवारी) जाहीर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनारायण यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत सर्वात जलद निकाल असल्याचे ते म्हणाले. सीईटीच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की इतक्या कमी कालावधीत निकाल जाहीर होणार आहेत. परीक्षेनंतर अवघ्या १९ दिवसांत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे भान ठेवून सरकारने घेतलेल्या उपायांचा हा एक भाग आहे, ते असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्च शिक्षण खात्याचे प्रभारी अश्वनाथनारायण यांनी फी आणि सीट-मॅट्रिक्स गुणोत्तर २०१९-२० या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच राहील असे म्हंटले आहे.