बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी गेल्या चोवीस तासात कोरोना संक्रमणाची ९१४० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे ९,५५७ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर राजधानी बेंगळूरमध्ये चोवीस तासात कोरोनाचे ३,५५२ नवीन रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९७,८१५ सक्रिय रुग्ण आहेत. तर शनिवारी राज्यात ६३,५८३ चाचण्या केल्या गेल्या आहेत. शनिवारी राज्यात ९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २१ बेंगळूरमध्ये मरण पावले आहेत.