कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 33 हजार 890, मृत्यूसंख्या 1028
दिवसभरात 670 रुग्ण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मागील चोवीस तासात कोरोनाचे 779 नवे रुग्ण आढळून आले. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्हय़ातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 33 हजार 890 इतकी झाली असून मृतांची संख्या 1028 वर पोहचली आहे. शनिवारी दिवसभरात 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आत्तापर्यंत 22 हजार 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 10 हजार 751 कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या जिल्हय़ात दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या 35 हजारच्या उंबरठय़ावर रुग्णांची संख्या येवून पोहचली आहे. शनिवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमधील 1939 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 1538 जणांचो अहवाल निगेटिव्ह तर 362 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऍंटिजेन टेस्टचे 394 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 348 निगेटिव्ह तर 46 अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी रुग्णालये आणि लॅबचे 779 अहवाल मिळाले. यातील 371 अहवाल पॉझिटिव्ह आले.
शनिवारी जिल्हय़ातील प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 239 रुग्ण कोल्हापूर शहरात आढळून आले. तर त्या खालोखाल करवीर तालुक्यात सर्वाधिक 123 रुग्ण मिळाले. मृत्यू झालेल्या 18 रुग्णांपैकी सीपीआरमध्ये 6, इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात 8 आणि खासगी रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाला.