बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा मृतदेह त्याच्या खोलीमध्ये सापडला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी म्हंटले की, एमटेक चे शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने, जो छत्तीसगडचा रहिवासी आहे, त्याच्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे असल्याच्या संशयावरून त्याने स्वतःचे जीवन संपले आहे.
या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाची कोणती लक्षणे होती की नाही याची इन्स्टिट्यूटने अद्याप खातरजमा केली नाही. दरम्यान, मृतांच्या स्वॅबी तपासणी करण्यासाठी मरणोत्तर ही तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.