बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीअंशी घट झालेली पाहायला मिळाली. बुधवारी राज्यात ९५८ नवीन रुग्णांना कोरोना संसर्गाची पुष्टी झाली आहे तर बुधवारी १,२०६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर राज्यात ९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १३,७३६ वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,०३८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. बुधवारी जिल्ह्यात ५५० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर ६९४ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले. तर २ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सध्या ९,००२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात आतापर्यंत ४,२८२ जणांचा मृत्यू झाला आहे.