बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिणा कन्नड जिल्ह्यातील बंटवाळ शहरात बुधवारी तुळू चित्रपट अभिनेता सुरेंद्र बंटवाळ याचा खून झाल्याचे उघड झाले. सुरेंद्राचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमधील रूममध्ये आढळून आला आहे. बंटवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मृतदेह एका सोफ्यावर पडला होता आणि त्याच्या शरीरावर चाकूने वर करण्यात आले आहेत.
बंटवाळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी. डी. नागराज यांनी “या खटल्याची कसून चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनुसार प्राणघातक शस्त्रास्त्रांनी त्याला ठार मारण्यात आले असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी सुरेंद्रच्या मित्राला त्याचा मृतदेहपोहायला मिळाला. त्याने पोलिसांना माहिती दिल्या नंतर श्वान पथकासह फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.