बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मंगळवारी चालू उत्सवाच्या हंगामात दक्षिण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी १ हजार अतिरिक्त बसेस चालविणार असल्याचे म्हंटले आहे. केम्पेगौडा बस स्थानकातून या विशेष बसगाड्या चालविल्या जातील.
केएसआरटीसीने १४ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी, दिवाळी उत्सव यासाठी आंतरराज्यीय बस सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांनुसार विस्तृत व्यवस्था केली आहे. केएसआरटीसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नोव्हेंबर १३ आणि १४ तारखेला बेंगळूर येथून या विशेष बसेस चालवल्या जातील. दरम्यान केएसआरटीसीने १६ नोव्हेंबरला परतीच्या सेवा देण्याचे नियोजित केले आहे.