बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे नगरविकास मंत्री बैराठी बसवराज यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री बसवराज यांची कोरोना चाचणी केल्यांनतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बेंगळुरूच्या कृष्णराजपुरम (केआर पुरम) मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे ५६ वर्षीय पुरूष बसवराज यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे म्हंटले आहे. तसेच मी तपासणी केली असून मला कोणतीही आरोग्य समस्या नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. बसवराज मला कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगून माझ्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बसवराज यांनी १२ सप्टेंबर रोजी दावणगिरी येथील हरिहर पंचमसाली मठावर लिंगायत वाचनानंद स्वामी यांची उपमुख्यमंत्री अश्वथनारायण सी एन, गोविंद एम. करजोल आणि दावणगेरे लोकसभेचे खासदार खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांच्या समवेत भेट घेतली होती.