बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य रस्ता परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) कर्मचार्यांनी वेतन-संबंधित मुद्द्यांवरून बुधवारी आठव्या दिवशीही संप सुरूच ठेवला आहे. संपामुळे केएसआरटीसीला १५२ कोटी रुपयांचा महसूल तोटा झाला आहे.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचार्यांच्या पुढाकाराने बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी), कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (केएसआरटीसी), उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनडब्ल्यूकेआरटीसी) आणि ईशान्य कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनईकेआरटीसी) चे कर्मचारी संपत सहभागी झाले आहेत. राज्य परिवहन कामगारांना सहाव्या वेतन आयोगानुसार सरकारने पगाराचीअंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत संघटनेने बुधवारपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे.
संपामुळे केएसआरटीसीला ७० कोटी, बीएमटीसी २० कोटी, एनडब्ल्यूकेआरटीसी ५० कोटी आणि एनईकेआरटीसीला ३१.५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.