बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक पीयूसी परीक्षेचा निकाल २० जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. पीयूसी परीक्षेसाठी ५.९५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेचा निकाल kseeb.nic.in, karresults.nic.in आणि result.bspucpa.com वर उपलब्ध असणार आहे. कोरोनामुळे निकाल लवकर लागेल की नाही या प्रतीक्षेत विद्यार्थी होते. पण शिक्षणमंत्र्यांनी २० जुलै पर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे म्हटल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक पीयूसी परीक्षांसाठी ५.९५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यापीठाच्या पूर्व शिक्षण विभागाने (पीयूई) एप्रिलमध्ये परीक्षा घेऊ न शकलेल्या केंद्रांना जूनमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार सोशल डिस्टंसिंग ठेऊन जूनमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या.