बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटक मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होताना पहायला मिळत आहे. बुधवारी राज्यात कोरोना पिझिटिव्ह रुग्णांचा वाढत आलेख खालीच राहिला. सलग चार पाच दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात ५,८७२ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. बेंगळूरमध्ये नेहमीप्रमाणे रुग्णाची संख्या जास्त पहायला मिळाली. जिल्ह्यात २,७१७ नवीन संक्रमित रुग्ण सापडले. राज्याला बुधवारी मोठा दिलासा मिळाला. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त हत्ती. राज्यातील विविध जिल्ह्यात ९,२८९ रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात बुधवारी एकूण ८८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी ५३ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात आतापर्यंत १०,६९६ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी, राज्यात कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण १,००,४४० होते. यापैकी ६३३४३ सक्रिय रुग्ण बेंगळूरमध्ये आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी २,७९८ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,८४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.