- कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार मागील तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागल्यामुळे त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. मात्र, ती निगेटिव्ह आली आहे. पण अजूनही थकवा जाणवत असल्याने त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कालपासून अजित पवारांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. अजित पवार यांनी आपलाा आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात होणारा जनता दरबार देखील रद्द करण्यात आला आहे. मात्र, संध्याकाळी वाय बी चव्हण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.