बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये मंगळवारी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली. मंगळवारी राज्यात १,३०० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यासह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ८,८६,२२७ वर पोहोचली आहे. यापैकी ८,५०,७०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान मंगळवारी राज्यातील विविध ८८६ जणांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तर मंगळवारी राज्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ११,७९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या २३,७०९ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ३३६ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मंगळवारी राज्यात ९४,८८५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत कर्नाटकात १,११,९७,२४० नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. कर्नाटकमधील कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण १.४० टक्के होते तर मृत्यूचे प्रमाण १.०५ टक्के होते.