बेंगळूर/प्रतिनिधी
इन्फोसिसच्या सहकार्याने शिवाजीनगरमध्ये उभारलेल्या १५० बेड क्षमतेच्या कोरोना रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केले.
वैद्यकीय मंत्री के. सुधाकर यांनी चार महिन्यांपूर्वी बीबीएमपी इमारतीत कोरोना रुग्णालय सुरू करण्याचा विचार केला होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हॉस्पिटलच्या मदतीसाठी इन्फोसिस फाऊंडेशनच्या सुधा मूर्ती यांना विनंती केली असता त्यांनी सहमती दर्शविली आणि ११ कोटी रुपयांच्या वैद्यकीय उपकरणांना मदत केली. त्याच वेळी, विप्रोने वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून दिले. याचा फायदा म्हणजे रुग्णालयाचा आर्थिक बोजा सरकारवर पडला नाही. त्यामुळे इन्फोसिस आणि विप्रोबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
रुग्णालयात १३० सामान्य बेड,२० आयसीयू बेड आणि २० व्हेंटिलेटर बसविण्यात आले आहेत. उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथनारायण, मंत्री सोमन्ना व इतर उपस्थित होते.